STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोनाच्या लढाईमध्ये पल्स ऑक्सिमिटरचे महत्व👍





1️⃣ *पल्स ऑक्सिमिटर* हे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण पाहायचे छोटेसे मशीन आहे.

2⃣ सर्वसामान्य *नॉर्मल मनुष्य प्राण्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण हे 97%ते 100% असतेच.* ( अपवाद- जुनाट फुफुसाचे व हृदयाचे आजार असणाऱ्या लोकांचे कमी असू शकतात)

3⃣ आपल्याला सर्वाना माहीत आहे की *Covid19 ह्या आजारांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते*, व अश्या पेशंटना वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्ण दगावू शकतो.

4⃣ *ऑक्सिजनच्या प्रमाणानुसारच ICMR ने कोरोना रुग्णांचे पुढीलप्रमाणे तीन कॅटेगरी मध्ये विभाजन केले आहेत.*

♦️ *सौम्य Mild आजार* - ज्यांचे ऑक्सिजन प्रमाण 94% पेक्षा जास्त आहे व ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत, किंवा सौम्य, हलकी लक्षणे आहेत.

♦️ *मध्यम आजार*- ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण 88 ते 94% आहे असे न्यूमोनियाची प्राथमिक लक्षणे असणारे रुग्ण. ( ताप,कोरडा खोकला, श्वसनासाठी त्रास होणे)

♦️ *तीव्र आजार*- ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण 88% पेक्षा खाली आहे व ज्यांना न्यूमोनियाची तीव्र लक्षणे आहेत, ज्यांना HFNC, NIV व व्हेंटिलेटरवर उपचार करण्याची गरज असते असे रुग्ण.

5⃣ *सध्या घरातच अचानक दगावत असलेल्या रुग्णांची संख्या खूप वाढली आहे*, अश्या रुग्णांनी आपला आजार अंगावर काढलेला असतो, भीतीपोटी उपचार घेतलेले नसतात, आणि असे रुग्ण लेट स्टेजला हॉस्पिटलमध्ये दाखल होतात, तेंव्हा त्यांना वाचवणे खूप कठीण असते. यासाठी लवकर निदान होऊन ताबडतोब उपचार करणे खूप महत्वाचे आहे, निदान लवकर होऊन उपचार घेणारे जास्तीत जास्त रुग्ण बरे होत आहेत.

6⃣ *हॅपी हायपोक्सीया* ( Happy Hypoxia) - समाजामध्ये कोणतीही लक्षणे नसणाऱ्या कित्येक लोकांचे ऑक्सिजन प्रमाण 94% पेक्षा कमी असलेले आढळले आहे, त्यामुळे सर्वच लोकांनी, रोजच्या रोज आपले ऑक्सिजन प्रमाण चेक करणे खूप गरजेचे आहे.

7⃣ *ऑक्सिजन प्रमाण चेक करण्याचे मशीन बाजारात आता 500 रु ते 1200 रु पर्यन्त मिळत आहे*, कोरोनाच्या सद्यस्थितीत प्रत्येक घरात हे ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याचे पल्स ऑक्सिमिटर मशीन हवे....

याबरोबर मास्क लावणे, 2 मिटरचे अंतर ठेवणे, गर्दीपासून दूर राहणे, वारंवार हात धुणे, किंवा सॅनिटायझर वापरणे या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या.

✅ *कोणतीही लक्षणे अंगावर न काढता, तात्काळ निदान करून सर्वोत्तम उपचार घेतल्यास आपण कित्येक लोकांचा जीव वाचवू शकतो*...🙏

- डॉ अमोल पवार
सामाजिक कार्यकर्ते, पलूस( सांगली)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.