NGO

|| आदर्श समाज परिवर्तन संस्था,पलूस द्वारे - सामाजिक उपक्रम ||

✅ पलूस मध्ये गेली 14 वर्षे अस्थिरोग तज्ञ म्हणून स्वतःच्या 35 बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अविरत वैद्यकीय सेवा,

वैद्यकीय सामाजिक उपक्रम-
  • सतत दरवर्षी सर्वरोग निदान व उपचार शिबीर, विविध शिबिरात मोफत औषध उपचार मोफत सर्व तपासण्या,
  • पोलीस व पत्रकार लोकांच्या मोफत तपासणी,
  • दरवर्षी रक्तदान शिबिरे,
  • दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील लोकांना सवलतीत उपचार,
  • ESIC योजनेमधून परिसरातील कामगार लोकांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांना मोफत कॅशलेस उपचार,
  • 4 वर्ष या सर्व पुरस्कार विजेत्या लोकांना आपल्या हॉस्पिटलमध्ये 50% मोफत उपचार,

✅ 2012 ते 2017 गेली 5 वर्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पलूस शाखेचे अध्यक्ष,
पलूस IMA शाखेतर्फे स्वछता अभियान, मोफत सर्वरोग निदान व उपचार, रक्तदान शिबिरे, इत्यादी सामाजिक उपक्रम, रुग्ण- डॉक्टर यांच्यातील सलोख्यासाठी समनव्य समिती साठी पुढाकार, पलूसच्या आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सतत सहकार्य,

✅ डॉ साधना अमोल पवार यांनी महिला आरोग्य परिसंवाद याच्या माध्यमातून परिसरातील विविध शाळा कॉलेज मध्ये जाऊन महिलांच्या आरोग्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन समाजसेवा,

✅ आदर्श समाज परिवर्तन संस्थेमार्फत डॉ पवार हॉस्पिटल च्या वर्धापन दिनानिमित्त नववर्षाच्या पहिल्या रविवारी सण 2015 पासून दरवर्षी खालील पुरस्कार दिले जातात,

भावी समाजाचा मूलभूत घटक व भावी भारतीय नागरिक म्हणून आजचा प्रत्येक विद्यार्थी आदर्श व्हावा, त्यावर आदर्श संस्कार व्हावेत, आणि त्याच्या आयुष्यात त्याने समाजासाठी काही आदर्श कामे करावीत या हेतूने आम्ही दरवर्षी पलूस तालुका व येळावी परिसरातील एकूण 33 शाळांमधील 70 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देणे हा अत्यन्त महत्वाचा सामाजिक उपक्रम राबवला जातो,

सद्य परिस्थिती मध्ये युवा पिढीला आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी गणेशोत्सव च्या माध्यमातून आपपल्या परीने काहीतरी सामाजिक उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून एक विधायक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळा ना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आदर्श गणेश मंडळ पुरस्कार दिले जातात,

आजच्या युवा पिढीपुढे आदर्श ठेवण्यासाठी, आपले व्यवसाय सांभाळून समाजात समाजउपयोगी चांगले काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते याना आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार दिले जातात, व त्यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिले जातात,

सामाजिक बांधिलकी म्हणून निस्वार्थीपणे समाजासाठी सतत कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांना आदर्श सामाजिक संस्था म्हणून पुरस्कार दिले जातात

✅ येळावी गाव आदर्श व स्मार्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न

वाचनालय बांधकाम करून सुरुवात,
व्यायामशाळा बांधकाम पूर्ण
गावातील सर्व शाळांमध्ये डिजिटल कलासरूम साठी मदत,
वृक्षारोपण कार्यक्रम,
स्वछता अभियान,
Microplaning सर्वे,
आमचा गाव आमचा विकास च्या साह्याने ग्रामसभेसाठी प्रबोधन,
गावातील गणेशोत्सव मंडळांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन,
स्वतः आदर्श गणेश मंडळ स्थापन करून दरवर्षी विवीध सामाजिक उपक्रम.

✅ मुख्य संयोजक व संस्थापक -ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय व व्यायामशाळा येळावी.
✅ अध्यक्ष आदर्श गणेश मंडळ येळावी.

✅ तासगाव व पलूस व एकूण सांगली जिल्ह्यात विविध भागात सतत विविध सामाजिक विषयावर पावरपॉइंट द्वारे प्रबोधनात्मक व्याख्याने,

आदर्श व स्मार्ट गाव,
कॅशलेस व्यवस्था
आदर्श विद्यार्थी व शैक्षणिक व्यवस्था,
लोकशाही की हुकूमशाही
भारतीय संविधान
ग्रामपंचायत व्यवस्था,
आप दिल्ली मॉडेल
पर्यावरण व वृक्षरोपण यावर व्याख्याने,

✅ खगोलशास्त्राची नव्यांने ओळख या टेलिस्कोपच्या साह्याने गावागावात अंधश्रद्धा निर्मूलन साठी व मुलांच्यात व सर्व लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवा यासाठी 2017 मध्ये श्री कृष्णा गायकवाड यांच्याद्वारे संपूर्ण सांगली जिल्ह्यात 15 गावात प्रत्यक्ष सादरीकरण व वैज्ञानिक गोष्टी बद्दल प्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम,

✅ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख म्हणून कराड, वाळवा, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील महामार्ग बाधित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने व उच्च न्यायालयात याचिका,

✅ सांगली कोल्हापूर महापुराच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, पूरग्रस्त लोकांचे प्रश्न व महापुर पुन्हा येऊ नये म्हणून उपाययोजना

✅पलूस परिसरातील सर्व सामाजिक संस्था व व्यक्ती एकत्र करून लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंचची स्थापना,

त्याद्वारे लोकशाही दिन
संविधान दिन
व त्याबद्दल रॅली, जागर परिषद, पत्रक वाटप, असे प्रबोधनात्मक कार्यक्रम करणे,

      खड्डे आंदोलन, अनिकेत कोथळे खून निषेध , महामार्ग संघर्ष समितीमधून, असे काही कृतिशील उपक्रम राबविण्यात आले,
     
✅ विविध पुरस्कार,-
सांगली कला व तंत्रज्ञान मंडळ यांचे तर्फे 2016चा धन्वंतरी पुरस्कार

आधार फौंडेशन पुणे यांच्या तर्फ
 2016 आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार

शासनाचा 2016 चा तालुक्यात प्रथम व जिल्ह्या तृतीय आदर्श गणेश मंडळ पुरस्कार,

तासगाव पोलीस विभागातर्फ सामाजिक कार्यबद्दल आदर्श गणेश मंडळ येळाविला विघ्नहर्ता प्रथम पुरस्कार.

✅  सोशल मीडिया, व्हाट्स अँप, फेसबुक यासारख्या आधुनिक मीडियाच्या माध्यमातून समाजप्रबोधन-
 
 सामाजिक कार्यकर्ते ग्रुप, लोकशाही वाचवा कृतिशील ग्रुप, आदर्श येळावी संकल्प ग्रुप, आदर्श शैक्षणिक विचारनियंम,या सामाजिक कार्यकर्त्यांच्या ग्रुपच्या आधारे सोशल मीडिया द्वारे लोकांचे विविध विषयांवर प्रबोधनात्मक संदेश व लेख लिहिणे,
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.