😷 *भारताचा इटली, स्पेन अमेरिका होणार काय?*

 इटली, अमेरिका, स्पेन व इतर युरोपियन देशासारखा खूप मोठ्या प्रमाणात होत असलेला कोरोना बाधित लोकांच्या मृत्यूचा हाहाकार आपल्या भारत देशात कमी प्रमाणात होईल का ???

 *खालील काही सकारात्मक गोष्टी* - 👇

✅ संपूर्ण देशच 21 दिवसांसाठी *लॉक डाऊन करण्याचा लवकर घेतलेला निर्णय*,

✅ *स्टेज 2 चा वाढत चाललेला कालावधी*, त्यामुळे संपूर्ण भारतभर जास्तीत जास्त परिसर निर्जंतुक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे, 

✅ काही ठराविक ठिकाणे *हॉटस्पॉट* वगळता आपण अजूनही आपण स्टेज 2 मध्येच आहोत, 

✅ *BCG लस*- पाश्चात्य व अमेरिका सारख्या देशात BCG लस घेतली जात नाही, पण आपल्या भारत देशात 1955 पासून ही BCG लस रुटीन लसीकरणाचा भाग आहे, यामुळे TB व फुफ्फुसाच्या निगडित प्रतिकारशक्ती भारतीयांच्या मध्ये पाश्चात्य देशा पेक्षा जास्त आहे असा निष्कर्ष काही तज्ञ लोकांनी काढला आहे, 

✅ मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्या वरील देशामध्ये *तापमान* हे 5 ते 18℃ च्या आसपास आहे, परंतु आपल्या देशात हेच तापमान सध्या 25 ते 45℃ पर्यन्त असल्याने व्हायरस संक्रमित होण्याचे प्रमाण कमी आहे, असे तुलनात्मक अभ्यास केल्यास दिसून येते, 

✅ हा विषाणू सतत स्वतःला बदलत असल्याने, आपल्याकडे आलेला कोरोना विषाणू कमी ताकदीचा *( less Virulent Virus)* असल्याचा काही तज्ञ लोकांचा निष्कर्ष आहे, 

✅ अस्वच्छता, वैयक्तिक स्वच्छतेविषयी अज्ञानता व इतर बऱ्याच कारणांमुळे आपल्या भारतीयांच्या मध्ये बरेच जीवाणू व विषाणू यांच्या विरोधात असलेली *नैसर्गिक प्रतिकारशक्ती* ( antibodies) तयार झालेली असल्याने ते याही Covid19 विषाणूंना जोरदार प्रतिकार करतील अशी आशा आहे, 

✅ *मलेरियाच्या विरोधातील जी Quinolone औषधे* सध्या Prevention मेडिसिन म्हणून वापरली जात आहेत,त्याचाही कुठेतरी मोठा उपयोग होताना दिसत आहे, 

या वरील सर्व कारणांमुळे भारत देशात खूप मोठ्या प्रमाणात संक्रमण होणार नाही, किंवा झालेच तर पाश्चात्य देशा सारखा नरसंहार होणार नाही अशी सकारात्मक आशा कित्येक भारतीय डॉक्टर्सना वाटत आहे...

*परंतु काही नकारात्मक बाबी सुद्धा आहेत* -👇
⚫ प्रचंड मोठी लोकसंख्या
⚫ अस्वच्छ राहण्याच्या सवयी
⚫ सतत उत्सव साजरा करण्याची मानसिकता
⚫ हॉस्पिटलची कमतरता
⚫ आय सी यु बेडसची कमतरता
⚫व्हेंटिलेटर ची कमतरता
⚫ PPE व N95 मास्कची कमतरता
⚫बेशिस्त जनता
⚫असंवेदनशील नेते
⚫कट्टर धर्मांधता व अंधश्रद्धा
⚫वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्टिकोनाचा अभाव
⚫घाणेरडे कुटील राजकारण

या ⚫ वरील सर्व गोष्टींच्यामुळे कोरोनाची भारतातील साथ मोठ्या प्रमाणात वाढण्याची सुद्धा दाट शक्यता आहे, *भारतातील सर्व नेते व सर्व जनतेने कोरोनाचा विषय जोपर्यंत गंभीरपणे घेत, कोणतेही राजकारण न करता, अत्यन्त प्रगल्भपणे, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सरकारने यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर करून देत नाहीत, तोपर्यंत हे कोरोनाचे संकट महामारी मध्ये रूपांतरित झाल्याखेरीज राहणार नाही हे नक्की* 🙏

- *डॉ अमोल पवार*
अस्थिरोग तज्ञ, डॉ पवार हॉस्पिटल पलूस

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.