STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोना झाला म्हणून घाबरून न जाता, त्याचा मुकाबला करा.



*कोरोना झाला म्हणून घाबरून न जाता, त्याचा मुकाबला करा...* 
               - डॉ अमोल पवार 

 1️⃣ कोरोना आजारामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण 1% पेक्षा कमी आहे...  कोरोनाचा आजार 90% लोकांच्यात सौम्य प्रमाणावर आहे, परंतु हेच लक्षनेविरहीत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण इतर सामान्य लोकांना हा आजार फार मोठ्या प्रमाणावर प्रसारित करू शकतात. मास्क न लावता समाजात वावरणारा एक पॉझिटिव्ह रुग्ण 14 दिवसात जवळपास इतर 400च्या वर लोकांना कोरोनाचा प्रसाद देऊ शकतो कोरोना संसर्ग देऊ शकतो. व घरातील व जवळच्या निष्पाप लोकांचा बळी घेऊ शकतो म्हणून आपण सतत काळजी घेणे आवश्यक.

2⃣ कोरोना आजारामध्ये जे कोमॉरबीड ( मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर असे प्रतिकारशक्ती कमी असलेले आजार व वयस्कर) लोक आहेत, त्यांना जास्त प्रमाणावर धोका आहे, म्हणून आपले हे सर्व इतर आजार कंट्रोल मध्ये हवेत. घरातील काळजी न घेणारे, व निष्काळजीपणे बाहेर फिरणारे युवा व इतर लोक आपल्या घरातील कोमॉरबीड व वयस्कर लोकांना हा आजार करीत आहेत हे ही लक्षात घ्या, सध्या आपण सर्वांनी सावध राहीले पाहिजे व मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटीझर वारंवार हात धुणे व इतर काळजी घेतलीच पाहिजे.

3⃣ प्रत्येक घरात चांगल्या  क्वालिटीचा पल्सऑक्सिमिटर असणे   सध्या खूप गरजेचे आहे, 500 ते 1000 रु पर्यन्त हा बाजारात विकत मिळतो. कोरोना झालेल्या व्यक्तींमध्ये जोपर्यंत ऑक्सिजन लेव्हल 94%च्या वरती म्हणजे 95,96,97,98 % आहे अश्यानी घरातच उपचार घ्या, स्वतःला इतर लोकांच्यापासून एक रूममध्ये आयसोलेट विलगिकरण करून घ्यावे व तज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने घरातच उपचार करू शकतात , म्हणून सध्या पल्स ऑक्सिमिटर चे महत्व वाढले आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने रोजच्या रोज दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा आपली ऑक्सिजन लेव्हल पहा. निगेटिव्ह असलेल्यांनि सुद्धा रोज आपली ऑक्सिजन लेवल पाहणे गरजेचे. 

4⃣ ज्या लोकांची ऑक्सिजन लेवल 94% पेक्षा कमी होत असेल त्यांनी तात्काळ ऑक्सिजन बेडस उपलब्ध असतील त्याठिकाणी ऍडमिट व्हावे. 
वेळेत ऍडमिट झालेल्यापैकी 90% रुग्ण पूर्ण बरे होत आहेत, फक्त जी लोक ऑक्सिजन लेवल खूप कमी असताना (80% पेक्ष्या कमी) ऍडमिट होतात किंवा ज्यांना मधुमेह व इतर  Comorbid आजार आहेत अश्या लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन होत आहेत.  मागील लाटेत मृत्युमुखी पडलेले बहुसंख्य लोक मधुमेह ग्रस्त होते हेही तितकेच खरे. म्हणून मधुमेह व इतर आजाराच्या लोकांनी आपला आजार नियंत्रित ठेवणं खूप महत्त्वाचं...

5⃣ कोरोना आजार अंगावर काढून कॉम्प्लिकेशन झालेले व ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या पेशंटना वाचवणे कोणत्याही हॉस्पिटलला खूप अवघड होत असते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत उपचार करून घ्या, हॉस्पिटल किंवा घरात हे कोरोनाचे 15 दिवस संयमाने विलगिकरणात काढले तर आपण 100% बरे होऊ शकता. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व शास्त्रीय  माहितीच्या साहायाने आपण कोरोनाचा मुकाबला नक्कीच करू शकतो व आपला आपल्या परिजनांचा जीव वाचवू शकतो..

- डॉ अमोल पवार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.