*पलूसचे डॉ अमोल पवार यांनी कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख रुपये देणगी दिली...*
पलूस परिसरात नेहमीच विविध सामाजिक कार्यात आघाडीवर असणारे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ अमोल पवार यांनी एक सामाजिक बांधीलकी म्हणून स्वतः एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी दिले आहेत, त्यांच्या या महान दातृत्वाबद्दल समाजाच्या विविध लोकांच्याकडून कौतुक होत आहे,
या मदतीबरोबरच त्यांनी स्वतःच हॉस्पिटल अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध करून इतर सर्व डॉक्टरांनच्या साठी एक आदर्श निर्माण केलेला आहे, कोरोनाच्या बाबतीत, खरी व अत्यन्त अभ्यासपूर्वक माहिती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या www. dramolpawar.in या वेबसाईटच्या माध्यमातून सातत्याने विविध ब्लॉग लिहून ते सोशल मीडियाच्या साहयाने लोकांच्यापर्यत पोहचवत आहेत, तसेच गरीब, गरजू परराज्यातून आलेल्या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत, तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी मूलभूत गरजेच्या गोष्टी N95 मास्क, ग्लोव्हज, इत्यादी साठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत...
पलूसचे डॉक्टर अमोल पवार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, नुकताच जो महापूर येऊन गेला होता, त्यावेळी त्यांनी पलूस तालुक्यातील चोपडेवाडी हे गाव प्राथमिक पुनर्वसन साठी दत्तक घेऊन इतर बऱ्याच गावांना जवळजवळ 1 हजार किट्स गरजू पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली होती, तसेच महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी अलमट्टी विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका डॉक्टरांनीच दाखल केलेली आहे, तसेच महामार्ग संघर्ष समितीच्या माध्यमातून गुहागर विजापूर महामार्गबधित हजारो शेतकऱ्यांना त्यांची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ते गेली 2 वर्ष मोठं जनआंदोलन उभे करून सातत्याने प्रयत्न करीत आहेत, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच माध्यमातून संविधान वाचवा लढा असेल,किंवा महामानवांची जयंती पुण्यतिथी वैचारिक रित्या साजरी करण्याचा उपक्रम असेल ते नेहमी पुढे असतात, तसेच त्यांनी आपल्या आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूसच्या माध्यमातून परिसरातील सर्वगुणसंपन्न मुलांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार, आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार देत असतात..
अशारितीने सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत असलेले डॉ अमोल पवार यांनी सध्या संपुर्ण देशावर आणि महाराष्ट्र वर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी, एक सामाजिक बांधिलकी म्हणून, आपला खारीचा वाटा असावा यासाठी एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केले आहेत.