STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

भारतातील गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यासाठी उपाययोजना

*गावातील गरीब शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्याचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी काही उपाय,* -

✅ 1. प्रथम सर्व गावातील शेतकऱ्यांचा वैयक्तिक, कौंटुंबिक, घराचा, शेतीचा, जनावरांचा, कर्जाचा आणि सर्व शेती उत्पन्नाचा आणि होनाऱ्या खर्चाचा प्रत्येक *कुटुंबगणिक खराखुरा संपूर्ण सुक्ष्मनियोजन सर्वे* केला गेला पाहिजे,

✅ 2. *यांच्यातून जो डेटा ( माहिती ) मिळेल त्याच्याआधारे प्रत्येक गावगणिक वेगवेगळे माहितीचे, विविध प्रश्नांचे नियोजन करून सध्याचा केंद्रशासित आणि राज्यशाषित जेवढ्या काही योजना आहेत त्या गरजू कुटुंबाला थेट देण्याची तरतूद करण्यात यावी,*
सध्या फक्त काही ठराविक कार्यकर्त्यांनाच अशा योजनांचा फायदा होतो किंवा करून दिला जातो, बऱ्याच योजनाचे पैसे या नियोजनाअभावी परत जातात,

✅ 3. गावातील *शिक्षणव्यवस्था* जर आपण बदलू शकलो आणि शहरांसारखी चांगली आणि समान शिक्षण जर आपण प्रत्येक खेड्यात मोफत देऊ शकलो तरी गावातील लोकांचा कितितरी खर्च वाचवू शकू,

✅ 4. गावातील *आरोग्यव्यवस्था* जर आपण अद्यावत करू शकलो म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यामध्ये जर आपण चांगल्या मूलभूत सोयी पूर्ण क्षमतेने देऊ शकलो तरी गावातील गरीब शेतकरी लोकांचे आरोग्यवरील आर्थिक ताण कमी होईल,

✅ 5, गावामधील *व्यसनाधीनता* कमी करण्यासाठी संपूर्ण दारूबंदी व संपूर्ण गुटखाबंदी करणे फार गरजेचे आहे,

✅ 6, गावामधील विविध कार्यक्रम उदा, यात्रा, जत्रा, देवधर्म, विविध प्रथा, सणासुदीवर *अंधश्रद्धेमुळे* होणारा वायफळ खर्च काही अंशी कमी केला तरी खूप मदत होईल,

✅ 7. *खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नात, बारस्यात, श्राद्धविधी मध्ये आणि तत्सम कार्यक्रमात होणारा अवाढव्य खर्च लोकांनी आता कमी करायला शिकले पाहिजे,*

✅ 8. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे आर्थिक नियोजन करून कमीत कमी *पीक विमा, स्वतःचा जीवनविमा, अपघात विमा, आरोग्य विमा* यासारख्या गोष्टी काढल्या पाहिजेत,

✅ 9. *शेतीमध्ये सुद्धा*
- *माती पाणी परीक्षण करून,*
- *हवामानाचा अंदाज घेऊन,*
- *उपलब्ध पाण्याचे नियोजन करून,*
- *योग्य ते पीक,*

- *परंपरागत शेती न करता,*
- *आधुनिक तंत्रज्ञान व अवजारे वापरून,*
- *समूहशेती सारखे पर्याय वापरून,*
- *सेंद्रिय शेती करण्याकडे वळले पाहिजे,*

अश्या रीतीने जर प्रत्येकाने *नियोजनबद्ध शेती* केली तर त्याला कोणत्याही समस्येला सामोरे जायला लागणार नाही,

✅ 10. *सरकार म्हणून शासनाने*
- *कर्जबाजारी गरजू गरीब शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता कर्जमाफी द्यावी,*
- *स्वामिनाथन आयोगाच्या सर्वच्या सर्व शिफारशी आता प्रत्यक्षात अमलात आणाव्यात,*
- *शेतमालाला हमीभाव देणे,*
- *बियाणे व खते कमी किमतीत देणे,*
- *24 तास वीज उपलब्ध करून देणे,*
- *पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध जलसंधारण कामे करून सर्वाना पाण्याची उपलंबद्धता करून देणे,*

*शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्वच्या सर्व योजना प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून देण्यासाठी गावोगावी "मोफत शेतकरी मदत केंद्र" उघडून त्याद्वारे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मदत करणे,*

अश्या रीतीने जर गावातील शेतकऱ्याला समजून घेऊन जर नियोजनबद्ध दूरगामी उपाययोजना केल्या तरच उद्याचा शेतकरी टिकणार आहे, आणि भावी गावातील युवा पिढी शहरात स्थलांतर करण्याऐवजी गावमध्येच स्वतःच रोजगार उपलब्ध करू शकतील आणि

*खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील शहरांच्या बरोबरीने भारतातील सर्वच्या सर्व 7 लाख गावे व खेडी स्वयंपूर्ण व सुखसंपन्न होतील.*

लेखक-
डॉ अमोल पवार,
संस्थापक अध्यक्ष,
आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस,

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.