STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

भारताच्या 74व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "कोरोनापासून आज़ादी" मिळविण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं?




✅ *N95मास्क* ची किंमत आता कमी झाली आहे, फक्त 30 ते 50 रुपयेला N95 मास्क मिळत आहेत, आता सर्वांनी घराबाहेर पडताना हे मास्क जरूर वापरावेत.

✅ इतर लोकांच्यापासुन कमीत कमी *2 मीटर शारीरिक अंतर* ठेवा.

✅ *सॅनिटायझरचा वापर* सातत्याने करा. शक्य होईल तिथे आपले हात स्वच्छ धुवा.

✅ बाहेर पडल्यास कुठल्याही पृष्ठभागाला हात लावू नका. *Non Touch Technic*.

✅ बाहेरचे खाणे पिणे टाळा.

✅ घरी आल्याबरोबर सर्व कपडे काढून ते धुवायला टाका, व स्वतः स्वच्छ पाण्याने आंघोळ करा.

✅ घरात आणणारी प्रत्येक गोष्ट स्वच्छ व शक्य असल्यास गरम पाण्यानी धुवा, बॉक्स किंवा कव्हर असणाऱ्या गोष्टीचे वेष्टन काढून तात्काळ फेकून द्या व आतील गोष्टी शक्यतो 48 ते 72 तासांनंतर वापरा.

उच्च प्रथिने व व्हिटॅमिन युक्त संतुलित आहार घ्या, रोज व्यायाम, योगा, प्राणायाम करा, पुरेशी झोप घ्या.

टीव्ही, पेपर व सोशल मीडियावरील नकारात्मक व भीतीदायक बातम्या पासून दूर रहा. योग्य काळजी घेऊन सकारात्मक रहा.

✅ परंतु आपणास ताप, अंगदुखी, खोकला, श्वसनास त्रास, चव व वास जाणे इत्यादी पैकी कोणतेही *लक्षण* दिसल्यास आपल्या डॉक्टर्सना भेटा व त्यांचा सल्ला घ्या.

✅ वरीलपैकी लक्षणे दिसत असल्यास शक्यतो आपण कोविड *टेस्टिंग* करून घ्यावी.

✅ जर टेस्ट पॉझिटिव्ह आलि असेल व आपल्याला मध्यम व तीव्र लक्षणे असल्यास आपण तात्काळ कोविड *हॉस्पिटलमध्ये ऍडमिट* व्हावे, लक्षणे नसणाऱ्या पेशंटनि *होम आयसोलेशन* पॉलिसी अंतर्गत घरच्या घरी उपचार करून घ्यावेत.

✅ यासाठी आपला *आरोग्य विमा* असल्यास उत्तम, नसल्यास कोविड आरोग्य विमा लगेच काढून घ्यावा.

✅ आपल्याला हॉस्पिटल्स मध्ये काही खर्चिक तपासण्या( 5 ते 10 हजार रु) किंवा इंजेक्शन (6 Inj. रॅमिडीसीविर=30000 रु) लागण्याची शक्यता आहे, यासाठी पुरेसे पैसे जवळ ठेवा. ( खाजगी हॉस्पिटल्स मध्ये सर्वोत्तम उपचार करण्यासाठी 1 ते 2 लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. ) म्हणून त्यासाठी *कोविड आरोग्य विमा* काढलेला उत्तम. परंतु सर्वच सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा याचे उपचार मोफत होत आहेत, परंतु याला काही मर्यादा आहेत.

✅ आपल्याकडे काही कोविड हॉस्पिटल्सचे फोन नंबर्स असणे अत्यन्त आवश्यक. *सर्व इमर्जन्सी नंबर्स तयार ठेवा.*

✅ आपल्या कुटुंबाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आधीच तजवीज करून ठेवावी. कुटुंबातील व्यक्ती जर पॉझिटिव्ह आल्यातर आपण काय करायचे याबाबत आपले आधीच *नियोजन* असलेले बरे,

✅ संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आल्यास आपल्याला जेवण व इतर सुविधा कश्या उपलब्ध होतील याची सुध्दा तजवीज करून ठेवावी.

✅कोरोना ही जागतिक महामारी आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कोणालाही हा कोविड19 कोरोना आजार होऊ शकतो यासाठी आपण तयारीत असणे खूप गरजेचे आहे.

🙏 *कृपया लक्षणे असल्यास अजिबात अंगावर काढू नका, कित्येक अत्यवस्थ पेशंट्स बरे होऊन परत आलेले आहेत, फक्त लवकर निदान करून सर्वोत्तम उपचार घेतल्यास आपल्याला काहीही होणार नाही हे लक्षात घ्या. परंतु वरीलप्रमाणे सर्व उपाययोजना करून ठेवा*.

धन्यवाद. 🇮🇳🙏🇮🇳

*डॉ अमोल पवार*
सामाजिक कार्यकर्ते पलूस ( सांगली)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.