1️⃣ आपल्या संपूर्ण लोकसंख्येचा घराघरात जाऊन कोरोनासदृश शोधण्यासाठी सखोल *आरोग्य सर्वे* करणे,
2⃣ कोरोनसदृश्य सर्व शंकास्पद व हाय रिस्क पेशंट्सचे अत्यन्त कमी वेळेत *मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग* करून घेणे. ( एक ते 2 महिन्यात टार्गेट लोकसंख्येच्या सर्व शंकास्पद लोकांचे टेस्टिंग करून घेणे)
3⃣ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे *कॉन्टॅक्ट ट्रेसिंग* जास्तीत जास्त प्रमाणात करणे.
4⃣ *विलगिकरण*- होम आयसोलेशन किंवा CCC कोविड केअर सेंटर मध्ये अश्या 80% लक्षनेविरहीत लोकांचे विलगिकरण करणे.( यांच्यावर उपचारापेक्षा त्यांना समाजापासून वेगळे ठेवणे गरजेचे, फक्त किरकोळ उपचार गरजेचे)
5⃣ *मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता करणे*- मध्यम ते तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर HFNO, NIV व व्हेंटिलेटरच्या साहयाने सर्वोत्तम उपचार करणे, आपल्याला मृत्यदर कमी करायचा असेल तर या गोष्टींची पूर्तता मोठ्या प्रमाणात केल्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय नाही...
6⃣ सद्यकाळात या संपूर्ण व्यवस्थेत काम करणाऱ्या *सर्व डॉक्टर्स, कोरोना वारीअर्स यांच्यासाठी योग्य त्या सर्व सोयीसुविधा निर्माण करून त्यांचा आदर करणे*, त्यांना विश्वासात घ्यावे..
7⃣ सर्वसामान्य लोकांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी *मीडिया* व इतर गोष्टीवर नियंत्रण ठेवून संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे.
8⃣ ही यंत्रणा राबविण्यासाठी प्रशासन अपुरे पडणार आहे, यामध्ये *उस्फुर्त पणे काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना घेऊन त्यांना योग्य ते ट्रेनिंग देऊन सामावून घेणे*
9️⃣ ही लढाई मानवजात वाचविण्यासाठी आहे, या लढाईत तुझ माझ असा संकुचित विचार करीत बसलो तर काही महिन्यानंतर आपण सर्वजनच मरून जाऊ. त्यामुळे सर्वाना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक लढा उभा करणं गरजेचं आहे...
🔟 *या जागतिक महामारीची भयानकता ओळखा*, निगेटीव्ह आलेले रुग्ण पुन्हा संक्रमित होण्याची शक्यता आहे, लस लवकर येणार नाही, अलीतरी किती दिवस संरक्षण देईल याबाबत शंका आहे, तीव्र आजार होऊन गेलेल्यांची फुफुसे fibrosis होऊन खराब होत आहेत.
- *डॉ अमोल पवार*