1️⃣ निर्णय प्रक्रियेत तज्ञ डॉक्टर्स लोकांचा तुटपुंजा सहभाग...सध्या सर्व निर्णय नेतेच घेताना दिसत आहेत, यामध्ये प्रत्येक राज्यात, शहरात, जिल्ह्यात, तालुक्यातील तज्ञ डॉक्टर्स व इतर समाजसेवी लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे अतिशय आवश्यक आहे...
2⃣ बाहेरच्या देशातील परिस्थितीचा सखोल अभ्यास करून वेळेत निर्णय घेण्याची असमर्थता- युरोप, किंवा इतर देशात 2ते 3 महिन्यामध्ये कोरोनाचा कर्व्ह पीक येऊन खाली सुद्धा आलेला आहे, पण गेली 5 महिने झाले आपला कर्व्ह अजून वरच्याच दिशेने जात आहे, याचा अर्थ आपलं कुठेतरी नियोजन चुकत आहे. आपण बाहेरच्या देशातील कोरोनाच्या नियोजनाचा अभ्यास करून यावर तज्ञ लोकांच्या मार्फ़त वेळोवेळी सर्वोत्तम निर्णय घेतले गेले पाहिजेत.
3⃣ *एवढ्या मोठ्या प्रचंड महामारीत सुद्धा ही राजकारणी लोक निरर्थक मुद्यांचे राजकारण करीत मुख्य प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत*,
4⃣ भारतातील स्वार्थी नेत्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेली *असंवेदनशीलता*
5⃣ येणाऱ्या संकटाला सर्व पक्ष, संघटना, समाजसेवक व तज्ञ लोकांना एकत्र घेऊन प्रामाणिकपणे या संकटाला सामोरे जाण्याची प्रचंड मोठी उणिव.
6⃣ *TRP च्या मागे धावणारा, ब्रेकिंग न्युज च्या नावाखाली लोकांना अत्यन्त भीतीयुक्त चित्र निर्माण करणारा अनिर्बंध व बेलगाम मीडिया...* व्हाट्स अप किंवा इतर असंख्य निर्बंध नसलेले यु ट्यूब चॅनेल सुद्धा काहीही फेक, अफवा किंवा चुकीच्या गोष्टी प्रसारित करीत आहेत.
7⃣ अपुरी माहिती असणाऱ्या राजकिय नेत्यांच्यापुढे नतमस्तक होणारे व आपलं स्वतःचे मत सुद्धा न मांडणारे प्रशासकीय अधिकारी.
8⃣ *प्रत्येक गावाचा आणि शहरांचा कसून आरोग्य सर्वे करणे, शंकास्पद लोकांचे मोठ्या प्रमाणात PCR, antigen, antibody टेस्टिंग्ज करणे व लोकांना आयसोलेशन करणे व तीव्र लक्षणे असणाऱ्या लोकांच्यावर तात्काळ सर्वोत्तम उपचार करणे व मृत्युदर कमी करणे हाच एकमेव उपाय आपल्यापुढे आहे...*
9️⃣ लॉक डाऊन हा उपाय कधीही नव्हता, फक्त मार्च एप्रिल मध्ये आपली तयारी करण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले होते, पण हीच तयारी 4 ते 5 महिने झाले तरीही कसलीही ठोस तयारी करण्यात आपली यंत्रणा खूप कमी पडलेली आहे हे वास्तव आहे.
🔟 *सध्या कायदा व सुव्यवस्था अत्यन्त ढिसाळ आणि शिथिल झालेली आहे*, त्यामुळे लोक बेफिकीरीने वागत आहेत, मास्क लावणे व सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी पोलीस आणि तत्सम यंत्रणेकडून कठोरपणे पावले उचलणे खूप गरजेचे आहे, यासाठी या कोरोनाच्या लढाईत प्रामाणिक व अभ्यासू नेत्यांनी गावातील किंवा शहरातील लोकांना यामध्ये सहभागी करून त्यांना ट्रेनिंग देऊन गावागावात *गाव / शहर संरक्षण दल* निर्माण करणे खूप गरजेचे आहे ...
*म्हणून रोजच्या रोज परिस्थितीचा आढावा घेऊन, प्रत्येक गावात / शहरात प्रशासन, संबंधित सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी व सर्व महत्वाच्या तज्ञ लोकांना एकत्रित घेऊन सर्वोत्तम उपाययोजना केल्या तरच ही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल... नाहीतर अशीच परिस्थिती राहिली तर येणारा काळ खूप कठीण व हाहाकार माजविणारा असणार आहे.*
- डॉ अमोल पवार
अस्थीरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते