जिल्हाधिकारी
सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा
*विषय - covid 19च्या आपल्या जिल्ह्यातील नियोजना बाबत.*
1️⃣ सध्या ज्यापध्दतीने मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे, ते अत्यन्त काळजी करण्यासारखे आहे, सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात आपण कितीही म्हटले तरी आपली संपूर्ण शासकीय यंत्रणा अपुरी पडणार आहे हे निश्चित. म्हणून *कोरोनाची लढाई ही संकुचित न ठेवता ती सर्वसमावेशक करण्यात यावी, यासाठी प्रत्येक शहरातील व तालुक्यातील संबंधित तज्ञ डॉक्टर्स, समाजसेवक, व निरोगी युवा स्वयंसेवक यांना सामावून घेण्यात यावे.*
2⃣ प्रत्येक तालुक्याला संबंधित तज्ञ डॉक्टर्सचा ( सरकारी व खाजगी डॉक्टर्स मिळून) टास्क फोर्स तयार करण्यात यावा.
3⃣ *प्रत्येक तालुक्यात RT-PCR बरोबरच रॅपिड अँटीजन तपासणी व Serosurvilance साठी अँटिबॉडी तपासण्या खूप मोठ्या प्रमाणात करण्यात याव्यात*.
4⃣ *होम आयसोलेशन* बाबतची सखोल व सविस्तर माहिती लोकांच्या पर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्यात यावी. जरी होम आयसोलेशन केले तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे.
5⃣ 80% लक्षणविरहित रुग्णांना जिल्हा कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात काहीही अर्थ नाही, त्यांना प्रत्येक तालुक्याच्या कोविड केअर सेंटर किंवा होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात यावे.
6⃣ *सध्या संपूर्ण फोकस covid19ची मध्यम व तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेडस, NIV, व व्हेंटिलेटर बेडस ची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात यावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि शहरात सर्व डॉक्टर्सना विश्वासात घेऊन तालुक्याच्याच ठिकाणी मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरसहित उपाययोजना करण्यात याव्यात*.
7⃣ यासाठी लागणारे सर्व सखोल ट्रेनिंग संबंधित तालुक्यातील किंवा शहरातील तज्ञ डॉक्टर्स, स्टाफ नर्स यांना देण्यात यावे.
8⃣ *प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक वार्डात गाव / वॉर्ड संरक्षण दल निर्माण करण्यात यावे. यासाठी त्या गावातील किंवा वार्डातील निरोगी युवा पिढीला स्वयंसेवक म्हणून घेण्यात यावे. या स्वयंसेवकाना गावातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, होम आयसोलेशन करणाऱ्या लोकांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पोलीस यंत्रणेला लागेल ती मदत करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे*.
9️⃣ वैद्यकीय सेवा व संरक्षण दल यांना लागेल ती मदत व त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण सदैव तत्पर राहावे.
🔟 कोरोना हे जागतिक संकट आहे, त्यामुळे यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामील करून घेतल्याशिवाय आणि त्यांना विश्वासात घेऊन, सर्व व्यवस्थेत पारदर्शकता ठेवून, अत्यन्त निरपेक्ष पणे आपण जर लोकसहभागातून ही लढाई उभी केली तरच यावर नियंत्रण मिळवता येईल नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे.
*अश्या रीतीने सतत अभ्यासपूर्ण निर्णय घेऊन, त्याचे योग्य व शाश्वत नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर निश्चितच कोरोनावर आपण विजय मिळवू शकू.*
धन्यवाद
*डॉ अमोल पवार*
प्रमुख डॉ पवार हॉस्पिटल पलूस व
सामाजिक कार्यकर्ता.