STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

जनरल प्रॅक्टिशनर व COVID 19


😷 *कोरोना Covid19ची सौम्य लक्षणे असणाऱ्या व होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणाऱ्या 80% रुग्णांवर गावातील जनरल प्रॅक्टिशनरच उपचार करू शकतात पण* ??? ( खालील सूचना पाळून)

1️⃣ *स्वतःची काळजी* - पेशंट्स तपासताना स्वतः व आपल्या स्टाफनी N95 मास्क, फेसशील्ड, कॅप व ग्लोव्हज वापरणे अत्यन्त आवश्यक. आपली ओपीडी रोज कमीतकमी दोन वेळा 1% सोडिअम हायपोक्लाराईड निर्जंतुक करणे आवश्यक, योग्य ती सर्व काळजी घेऊन पेशंट्स तपासल्यानंतर प्रत्येक वेळेस हँड सॅनिटायझरचा वापर करणे, सद्या खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे लक्षनेविरहीत पेशंट्स समाजात आहेत त्यामुळे येणारा प्रत्येक पेशंट हा कोरोनाचा असू शकतो असे गृहीत धरूनच सर्वोत्तम काळजी घेऊन आपली ओपीडी पाहणे,

2⃣ *लक्षणे* - ताप, खोकला, प्रचंड अंगदुखी, श्वसनास त्रास, चव व वास जाणे, पोटात दुखणे, Diarrhea अशी व इतर कोणतीही शंकास्पद कोरोनसदृश्य लक्षणे असणारे सर्व पेशंट्स Suspected Covid पेशंट्स आहेत असेच समजा...

3⃣ *पल्स ऑक्सिमिटर* - प्रत्येक पेशंटचे पल्स ऑक्सिमिटर च्या साहाय्याने ऑक्सिजन तपासणी केलीच पाहिजे, 94% पेक्षा कमी ऑक्सिजन लेव्हल असणाऱ्या व हाय रिस्क CoMorbid पेशंट्सवरती अजिबात प्रयोग करीत बसू नका, त्यांचा महत्त्वाचा वेळ वाया घालवू नये, अश्या पेशंट्सना तात्काळ ऑक्सिजन बेडस वरती ऍडमिट करण्याची गरज असते. असे ऑक्सिजन लेव्हल कमी असणारे पेशंट्स आपण तात्काळ योग्य ठिकाणी पाठवले तर आपण त्याचा जीव नक्की वाचवू शकतो.
ऑक्सिजन लेव्हल खूप कमी येईपर्यंत आपण उपचार करीत राहिलो तर पेशंट्स दगावण्याची शक्यता आहे.

4⃣ *प्राथमिक तपासण्या* - सर्व शंकास्पद व कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कमीत कमी CBC व CRP व इतर रक्ताच्या तपासण्या करून घ्या. यामध्ये Total WBC व lymphocyte काऊंट कमी आलेला असतो, प्लेटलेट्स सुद्धा कमी होतात व CRP - पॉझिटिव्ह असते. अश्या पेशंटना तात्काळ RT PCR किंवा रॅपिड अँटीजन करून घ्यावी, *लक्षणे असणाऱ्या पॉझिटिव्ह व निगेटीव्ह अश्या सर्वच पेशंटना शंकास्पद कोविड रुग्ण म्हणूनच योग्य ते उपचार सुरू करावेत.*

5⃣ *CT Scan*- ज्या पेशंटना ताप येऊन आता खोकला येत आहे, थोडा श्वसनास त्रास होत आहे, ज्यांचे ऑक्सिजन प्रमाण 95% पेक्षा कमी होत आहे अश्या सर्व पेशंटचे 5 ते 7 व्या दिवशी (लक्षणे सुरुवात झालेला पहिला दिवस पकडा) छातीचा HR CT स्कॅन करून घेणे. स्कॅनच्या स्कोअर वरून तो पेशंट्स moderate व severe असेल तर त्याला तात्काळ ऑक्सिजन असलेल्या बेडसवरती ऍडमिट होण्यासाठी पाठवणे. ज्याठिकाणी CT स्कॅनची सोय नाही अश्या वेळी कमीत कमी Chest X ray काढून घेऊन प्राथमिक निदान करावे.

6⃣ *Mild Cases* - कोरोना पेशंटचे ऑक्सिजन प्रमाण 95% वरती असेल, सौम्य लक्षणे असतील, CT स्कॅन चा स्कोअर Mild असेल तर आपण अश्या पेशंटना घरातच होम आयसोलेशन मध्ये योग्य ते उपचार आपण देऊ शकता.

7⃣ *प्राथमीक उपचार* - होम आयसोलेशन मध्ये राहणाऱ्या व टेस्ट निगेटीव्ह असूनही कोरोनसदृश्य सौम्य लक्षणे असणाऱ्या सर्व पेशंटवर आपण सर्व प्राथमिक उपचार करायचे आहेत,
- Tab Vitamine C
- Tab Becozinc ( B complex + zinc)
- Tab Fabiflu course.
- Tab Paracetamaol if Temp.
- Tab Doxy/ Azitral / Cefuroxime ( any one) as supportive antibiotic if infection.

8⃣ *Advanced Test* - कोरोना पेशंट्स मध्ये Sr Ferritin, D- Dimer या टेस्ट Coagulopathy ( रक्तात गुठळी होण्याचे प्रमाण) पाहण्यासाठी केल्या जातात, व LDH व IL-6 या टेस्ट Inflammatory Markers आहेत. Cytochrome strome ओळखण्यासाठी याचा वापर होतो, या टेस्ट आपण काळजी म्हणून Mild to Moderate आजारांमध्ये करू शकता. पण शक्यतो एम डी मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या बऱ्या.

9️⃣ *होम आयसोलेशन* मध्ये घरात राहून उपचार घेणाऱ्या व अतिशय सौम्य लक्षणे असणाऱ्या व SPO2 95% जास्त असणाऱ्या Co-morbid ( DM, HTN, IHD, COPD, Cancer, etc) पेशंट्स मध्ये आपण *MD मेडिसिन असलेल्या फिजिशियनच्या सल्ल्याने* Antithrombin (Tab Dabistar), Tab Favipiravir तसेच Tab Medrol 4mg अशी औषधे सुरू करू शकता.

🔟 *अत्यन्त महत्वाचे* - ऑक्सिजनचे प्रमाण 94% पेक्षा कमी व CT स्कॅनचा स्कोअर Moderate व Severe असणाऱ्या पेशंटवर कृपया आपल्या जनरल ओपीडीमध्ये अजिबात प्रयोग न करता तात्काळ ऑक्सिजन बेडस असणाऱ्या हॉस्पिटल मध्ये दाखल करावे, व इतर सौम्य लक्षणे असणारे, SPO2 95% पेक्षा जास्त व होम आयसोलेशन मध्ये राहणाऱ्या 80%रुग्णांवर आपण आपल्या गावातच योग्य उपचार करून या कोरोना महामारीत अतिशय महत्वाचे योगदान देऊ शकता.

   *कोरोनाच्या या जागतिक महामारीत आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची योग्य ती सर्व काळजी घेऊन आज डॉक्टर या नात्याने आपण जे मानवजातीला वाचविण्याचे  अनन्यसाधारण काम करीत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आभार* 🙏 

- डॉ अमोल पवार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.