सुरुवातीच्या 2ते 3 महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात खूप कमी टेस्टिंग करणे हे भारतात कोरोनाची महामारी वाढण्याचे प्रमुख कारण आहे. कारण Asymptomatic हजारो पेशंटचे वेळेत टेस्टिंग न केल्याने ते मोठ्या प्रमाणावर समाजात कोरोना पसरवीत राहिले...
सर्वात जास्त इंग्लंड मध्ये 24% लोकसंख्येचे टेस्टिंग केले आहे, इंग्लड मध्ये प्रत्येक 10 लाख लोकसंख्येला 242929 लोकांचे टेस्टिंग केलेले आहे, रशिया मध्ये लोकसंख्येच्या 19% अमेरिकेत 18% ही आकडेवारी आहे. ज्या ज्या देशांनी कमीत कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग केले त्या देशांचे 2 ते 3 महिन्यात ग्राफ चटकन खाली आले. याच मुख्य कारण मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करून अश्या लोकांना 21 दिवसांसाठी समाजापासून विलगिकरण करून इतर लोकांना कोरोना होण्यापासून वाचवले. कोरोनाची संख्या वाढणे यामुळे घाबरण्याचे मुळीच कारण नाही, 100 कोरोनाच्या रुग्णांमधील 80 लोकांना अजिबात उपचाराची आवश्यकता नाही, लक्षणे असणाऱ्या फार थोड्या 15 ते20% लोकांनाच हॉस्पिटलमध्ये उपचाराची आवश्यकता आहे. तेही रुग्ण वेळेत टेस्टिंग करून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास असे सर्व पेशंट्स वाचू शकतात...
आणि आपण भारत देशात सध्या रोज जरी 6 लाख लोकांची तपासणी करीत आहे, तरीही ते प्रमाण कमीच आहे, आजपर्यंत 2 करोड लोकांची तपासणी केलेली आहे तरीही ती फक्त लोकसंख्येच्या 1.4% एवढीच झाली आहे, कमीत कमी 10% लोकसंख्येचे कमीत कमी वेळेत टेस्टिंग होणे खूप गरजेचे आहे. कारण आपण जोपर्यंत टेस्टिंग जास्त करणार नाही, तोपर्यंत अनेक लक्षनेविरहीत पेशंट समाजात ही कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरवीत राहणार हे लक्षात घ्या,
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त टेस्टिंग करणे हेच कोरोना नियोजनात अतिशय महत्वाचे आहे.
- डॉ अमोल पवार