😷 *कोरोना आता तुमच्या गावात, तुमच्या दारात आलाय* ....🙏
कोरोना विषाणू चीन ➡️ इटली➡️ अमेरिका➡️ मुंबई➡️पुणे ➡️ ???? अस करीत आता तुमच्या शहरात, तुमच्या गावात, तुमच्या दारात आला आहे...
🌐 कोरोना जगभर पसरला आहे, 200 हुन अधिक देशात त्याचा हाहाकार उडाला आहे... आजपर्यंत संपूर्ण जगात 35लाख कोरोनाबधित झालेले आहेत व अडीच लाखाच्या 2,50,000 च्या आसपास मृत्यू झालेले आहेत, आणि WHO च्या इशाऱ्या नुसार अजून खूप मोठी हानी होणार आहे, यावरून याची भयानकता समजून घ्या...
🇮🇳 *आपल्या भारत देशात 40000 च्या आसपास कोरोनाग्रस्त झाले आहेत, फक्त महाराष्ट्रात 13000 रुग्ण आहेत, भारतात एकूण 1300च्या वर मृत्यू झालेले आहेत, व अजूनही चालूच आहेत, लॉकडाऊन केल्यामुळे त्याचा प्रसार आपल्या भारतात संथपणे होत आहे, याचा अर्थ असा नव्हे की तो थांबला आहे किंवा आपल्याकडे येनारच नाही. कोरोना हा Highly Contagious (अति संक्रमनशील) आहे हे लक्षात घ्या...माणसाकडून माणसाकडे खूप मोठ्या गतीने प्रसारित होत आहे, हा प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात येणार आहे हे गृहीतच धरा, त्यामुळे आता खरी परीक्षा आपल्या धैर्याची आहे, आपल्या संयमाची आहे...*
✅ *मग याला उपाय काय ?* 👇
*जोपर्यंत याचा पीक (उच्चांक) येऊन उतार येत नाही व म्हणजे जोपर्यंत कोरोनाबधित होणाऱ्या लोकांचा आकडा हा कोरोनामुक्त होणाऱ्या आकड्यापेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्याच्या संक्रमणाचा धोका आहेच हे लक्षात घ्या,*
🔴 कोरोनाबाधित लोकांचा सध्या मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मुंबई व पुणे या ठिकाणी पीक ( उच्चांक) होण्याची शक्यता आहे, व त्यांनतर त्याचा उतार होण्याचा कालावधी जून महिन्यापर्यंत असू शकतो, 95 ते 99% हा आपला भाग जून एन्ड पर्यंत कोरोनामुक्त होऊ शकेल अस तज्ञ लोकांचं मत आहे, हा काळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो... मागील आठवड्यापासून महाराष्ट्र मधील इतर ठिकाणी कोरोनाचे संक्रमण एकदम वाढलेले दिसत आहे, याचा अर्थ असा की आपल्याकडे आता कुठे सुरुवात झाली आहे, संपूर्ण मे महिना अत्यन्त जोखमीचा आहे, खूप केसेस वाढण्याची शक्यता आहे, आपल्याकडे मे एन्ड पर्यन्त पीक(उच्चांक) होऊ शकेल व त्यांनतर त्याचा उतार जून पर्यंत राहील अशी अपेक्षा आहे,
🙏 *म्हणून आता उलट आपला कसोटीचा क्षण आलेला आहे, आता लॉक डाऊन शिथिल केले म्हणून आपण निवांत होण्याचा अजिबात काळ नाही, आतापर्यंत लॉक डाऊन मध्ये घेतलेल्या सर्व कष्टाचे पाणी होईल, आता आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे, आता सर्व उपाययोजना काटेकोरपणे पाळणे खूप गरजेचे आहे, घरातून अजीबात बाहेर न पडणे, सतत हातांची स्वच्छता करणे, सॅनिटायझर लावणे, मास्क लावणे, 2 मीटर पेक्षा जास्त शारीरिक अंतर पाळणे या गोष्टी आपण किती काळजीपूर्वक करतोय यावर आपलं सर्वांचं आरोग्य अवलंबून आहे हे कृपया लक्षात घ्या...* 😷
✅ आपली प्रतिकारशक्ती वाढवणे, शांत पुरेशी झोप घेणे, रोज कमीत कमी अर्धा एक तास व्यायाम करणे, घाबरून न जाता मानसिक दृष्ट्या सक्षम राहणे, वयस्कर लोकांची काळजी घेऊन त्यांना घरातच कठोरपणे quarantine करणे...हेही खूप महत्वाचे आहे...
🌐 हेही दिवस जातील, या पृथ्वीवर कोणतीही गोष्ट अजरामर नाही, मानवी जीवनाप्रमाणे याही कोरोनाचा अंत होणार आहे, तोपर्यंत धीर धरणे गरजेचे आहे, *गेल्या शंभर वर्षात जी मानवाने निसर्गाची प्रचंड मोठी हानी केली आहे, निसर्गाला पुन्हा संवर्धित होण्यासाठी थोडा वेळ देऊया*. थोडे दिवस अजून संयम पाळूया... या संपूर्ण मानव सृष्टीवर आलेले संकट दूर करण्यासाठी घरातच राहून आपण काटेकोरपणे पणे थोडी बंधने पाळूया...🙏
- *डॉ अमोल पवार*
अस्थिरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पलूस ( सांगली)
टीप- कोरोनाविषयी अधिक माहितीसाठी ➡️ www.dramolpawar.in या वेबसाईटवर क्लीक करा...