STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

आजची निवडणूक- एक तमाशा ( लोकशाहीची थट्टा)

*आजची निवडणूक- एक तमाशा ?( एंटरटेनमेंट शो ) का लोकशाहीची थट्टा ?*

१. *रोज रोज सर्व ग्रुप वरती, वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर सध्याच्या निवडणुकीबद्दल जश्या बातम्या वाचायला व ऐकायला मिळतात ते पाहून असच वाटत कि खरंच या बहुतांशी लोकांनी आपल्या या व्यवस्थेचा, लोकशाहीचा आणि संविधानाचा खेळ मांडला आहे, अक्षरशः तमाशा केला आहे,*

२. *निवडणूका म्हणजे लोकांना वर्ष आणि वर्ष त्याच त्याच थापा मारायचे ठिकाण,*

३. *कोणत्याही ठोस उपाययोजना किंवा ब्लूप्रिन्ट घेऊन एखादा पक्ष आला आहे आणि निवडून आल्यावर त्यांनी त्या गोष्टी करून दाखविल्या आहेत असं कधी झालं नाही,*

४. *कोणतीही नीतिमत्ता नसलेल्या, कंत्राटदार, गुंड प्रवूती च्या लोकांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचे, आणि त्यांच्या पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर निवडून यायचे आणि परत लोकांच्या टॅक्सरूपी पैशावर टक्केवारीने अत्यन्त पद्धतशीरपणे घातलेल्या पैशाची व्याजासाहित लूट करायची एवढी एक कलमी कार्यक्रम करून लोकशाहीची व्याख्या पूर्ण धुळीस मिळविली आहे,*

५. *कोणता उमेदवार कोणत्या पक्षात आहे,हे कळायला नेम नाही, रोज रोज फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलणारे उमेदवार पहिले कि असे वाटते की या लोकांनी आपल्या लोकशाहीचा बाजार मांडला आहे आणि सामान्य माणसाची जणू थट्टा करीत आहेत,*

६. *फक्त आणि फक्त पैशाची भीक टाकून अक्षरशः लोकांची मते विकत घेऊन, करोडो रुपयांची अशी उधळण करून लोकांना त्यांच्या मतासाहित विकत घेऊन निवडून येणाऱ्या अश्या लोकांच्याकडून तुम्ही कसली अपेक्षा ठेवणार,*

७, *दारूच्या पार्ट्या, मटणाच्या पार्ट्या, नाचगाणी, मोठमोठया अश्लील गाण्यावर प्रचार, आणि बेरोजगार तरुणांना नुसतं वापरून घ्यायचं, आणि लोकांना नुसत्या थापा मारून हि लोक समाजापुढे कोणता आदर्श ठेवतायेत,*

८, *पैसे घेऊन मते विकत देणाऱ्या अश्या लोकांच्याकडून हि आपण कोणती लोकशाहीची अपेक्षा ठेवणार, पैसे घेणारी हि लोकहि आपली हि लोकशाही व्यवस्था रसातळाला न्यायला तितकीच कारणीभूत आहेत*

खरच आपली हि लोकशाहीची व्यवस्था एवढी खराब झाली आहे का, आणि याला जाबाबदार असणाऱ्या घटकांना आपण अशीच साथ देत राहणार आहे का, सामान्य माणसाच्या हातात खरंच काही अधिकार आहेत का,??

*लोकांनी लोकांच्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मार्फत लोककल्याणकारी योजना राबविणे हा एकदम सोपा अर्थ लोकशाहीचा आहे*

संविधान व लोकशाही मध्ये - एक सामान्य नागरीक हा उच्च स्थानी मानला आहे, खरं तर सामान्य माणसाला संविधानाने खूप मोठे अधिकार दिले आहेत, पण त्या सामान्य माणसाला त्याच्या हक्काची, अधिकाराची माहिती माहित नाही, कारण आपल्या या व्यवस्थेमध्ये, शिक्षणामध्ये, याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे,

*कृपया कोणत्याही दबावाखाली न येता, कोणत्याही प्रलोभनांना आहारी न जाता, अत्यंत विचारपूर्वक, सर्वसामान्यांची जाण असणारा, अभ्यासू, शिक्षित, समाजकार्याची आवड असणारा, निस्वार्थी उमेदवार तुमचा लोकप्रतिनिधी ( लोकसेवक) म्हणून निवडून द्या, आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला जिवंत ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे,*

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.